<script data-ad-client="ca-pub-5920868283967953" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
"केंजळगड"
10 नोव्हेंबर 18 रोजी मी आणि बाळा(लिमन) आम्ही दोघांनी केंजळ गडाच्या मोहिमेसाठी जाण्याचे ठरवले, ठरल्या प्रमाणे दिवस पण उजाडला पण या बाळाचा काय अजून दिवस उजाडला न्हवता,सकाळी पावणे सात पासून फोन करतोय, पण हा काय फोन उचलायचा नावच घेईना (फोन च्या आवाजाने घरातील सर्व मंडळी उठतात पण हा काय उठत नाही अशी याच्या घरच्यांची तक्रार आहे. ),मग मीच त्याच्या घरी पोहचलो तर साहेब अजून गाढ निद्रेत होते,आरामात साहेब उठले आवरल ,चहा पिला मग साडे आठ वाजता आरामात आवरून झाल्यावर आम्ही निघालो.
केंजळगड हा पुण्यापासून सुमारे 80 km अंतरावर आहे.
Pune to kenjal gad route
शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे हायवे ला भरपूर ट्रॅफिक होते,आम्ही आमची गाडी सापासारखी वेडी वाकडी वळणाने कासवाच्या गतीने पुढे नेत होतो.
हायवे वरून भोर फाट्या कडे गाडी आम्ही वळवली,आता जरा कुठे बर वाटलं जास्त गाड्यांची ये जा न्हवती रस्त्याच्या दुतर्फा झाडी , शेती याची सांगड होती.
अर्धा रस्ता कापल्यावर चहा ची गरज होती. तसेच सोबत नाष्टा सुद्धा केला आणि पुढच्या प्रवासाठी वडा पाव सुद्धा घेतले.
आता नॉन स्टॉप आम्ही गाडी गडाच्या पायथ्याला थांबवली,गडावर जाण्यासाठी चा दिशा दर्शक फलक.
रणरणत्या ऊन्हात गावातून गडाची पाहणी करताना,
गडावर जाण्यासाठी साधारण एक तास भर लागतो,रस्ता हा डोंगरातून पायवाट काढत गर्द झाडी झुडपातून जातो.
डोंगरातील पायवाट आपल्याला गडाच्या पायऱ्या पर्यंत पोहचवते आणि उजवी कडील वाट गुहे कडे जाते.
गडाचे वैशिष्ट्य कातळ फोडून कातळात कोरलेल्या 54 पायऱ्या अप्रतिम आहेत.
गडावर पोहचल्यावर आपणास प्रथम छप्पर नसलेल्या देवळात केंजाई देवीचे दर्शन होते.
गड माथ्यावरून आपणास ऐटीत उभा असलेला सह्याद्री पाहण्यास मिळतो हे दृश्य माझ्या शब्दात फारच कडक आहे.
पाण्याचे टाके
गडावर 2 चुनाच्या घाणा पाहण्यास मिळतात,सहसा इतर गडावर 1 घाणा असतात पण इथे 2 आहेत याचाच अर्थ असा की गडावर खूप बांधकाम झाले असणार , पण आता उरलेत फक्त काही अवशेष.
दारूगोळ्याचे कोठार
केंजळगडा वरून रायरेश्वरावर जाण्यासाठी मार्ग.
गडाची तटबंदीची कालांतराने पडझड झालेली दिसून येते.
गडावरील काही फोटो,2 तासात गड पाहून झाल्यावर आता वेळ होती ती पोट पूजा करायची,गडावरती सावली साठी कोणत्याही प्रकारचा आडोसा नसल्याने आम्ही कातळ पायरीवर बसुन पोट पूजा केली.
जिवाजी महाले यांचे समाधी स्थळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून यांची ख्याती,
जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला
दर्शन घेऊन आम्ही पुढे नागेश्वर मंदिर तसेच झुलता पूल आणि नेकलेस पॉईंट पाहिला या ठिकाणाची माहिती आदीच्या ब्लॉग वर आहे,खाली लिंक दिलेली आहे कृपया लिंक ओपन करून पाहणे
Rayreshwar,nageshwar temple and hanging bridge
महाराजांचे गड किल्ले बघताना आपण त्या इतिहासात कधी हरवून जातो समजतच नाही,आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून एखाद दिवस असा इतिहासात हरवुन जायची मजाच काही और आहे.
या प्रकारे अजून एका सुखद ऐतिहासिक अनुभवाची भर आयुष्याच्या वहीत लिहली गेली.
आपण अमूल्य वेळ काढुन वाचल्या बद्दल धन्यवाद ...
"केंजळगड"
10 नोव्हेंबर 18 रोजी मी आणि बाळा(लिमन) आम्ही दोघांनी केंजळ गडाच्या मोहिमेसाठी जाण्याचे ठरवले, ठरल्या प्रमाणे दिवस पण उजाडला पण या बाळाचा काय अजून दिवस उजाडला न्हवता,सकाळी पावणे सात पासून फोन करतोय, पण हा काय फोन उचलायचा नावच घेईना (फोन च्या आवाजाने घरातील सर्व मंडळी उठतात पण हा काय उठत नाही अशी याच्या घरच्यांची तक्रार आहे. ),मग मीच त्याच्या घरी पोहचलो तर साहेब अजून गाढ निद्रेत होते,आरामात साहेब उठले आवरल ,चहा पिला मग साडे आठ वाजता आरामात आवरून झाल्यावर आम्ही निघालो.
Pune to kenjal gad route
शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे हायवे ला भरपूर ट्रॅफिक होते,आम्ही आमची गाडी सापासारखी वेडी वाकडी वळणाने कासवाच्या गतीने पुढे नेत होतो.
हायवे वरून भोर फाट्या कडे गाडी आम्ही वळवली,आता जरा कुठे बर वाटलं जास्त गाड्यांची ये जा न्हवती रस्त्याच्या दुतर्फा झाडी , शेती याची सांगड होती.
चहा नाष्टा केल्यावर फोटो साठी पोज देताना.
रणरणत्या ऊन्हात गावातून गडाची पाहणी करताना,
गडावर जाण्यासाठी साधारण एक तास भर लागतो,रस्ता हा डोंगरातून पायवाट काढत गर्द झाडी झुडपातून जातो.
डोंगरातील पायवाट आपल्याला गडाच्या पायऱ्या पर्यंत पोहचवते आणि उजवी कडील वाट गुहे कडे जाते.
गडाचे वैशिष्ट्य कातळ फोडून कातळात कोरलेल्या 54 पायऱ्या अप्रतिम आहेत.
सभोवतालचा प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत.
गड माथ्यावरून आपणास ऐटीत उभा असलेला सह्याद्री पाहण्यास मिळतो हे दृश्य माझ्या शब्दात फारच कडक आहे.
पाण्याचे टाके
गडावर 2 चुनाच्या घाणा पाहण्यास मिळतात,सहसा इतर गडावर 1 घाणा असतात पण इथे 2 आहेत याचाच अर्थ असा की गडावर खूप बांधकाम झाले असणार , पण आता उरलेत फक्त काही अवशेष.
दारूगोळ्याचे कोठार
केंजळगडा वरून रायरेश्वरावर जाण्यासाठी मार्ग.
गडाची तटबंदीची कालांतराने पडझड झालेली दिसून येते.
गडावरील काही फोटो,2 तासात गड पाहून झाल्यावर आता वेळ होती ती पोट पूजा करायची,गडावरती सावली साठी कोणत्याही प्रकारचा आडोसा नसल्याने आम्ही कातळ पायरीवर बसुन पोट पूजा केली.
"दिवाळी चिवडा आणि वडा पाव"
पोटपूजा झाल्यावर गड उतरून जवळील आंबवडे गावा मध्ये आम्ही जिवाजी महाले आणि कान्होजी जेधे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.
जिवाजी महाले यांचे समाधी स्थळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून यांची ख्याती,
जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला
म्हणतात ना.....
"होता जिवा, म्हणून वाचला शिवा"
कान्होजी जेधे समाधी स्थळ
कान्होजी जेधे हे शिवाजी महाराज्यांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते.शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक सरदारांचा पाठिंबा मिळवून दिला.दर्शन घेऊन आम्ही पुढे नागेश्वर मंदिर तसेच झुलता पूल आणि नेकलेस पॉईंट पाहिला या ठिकाणाची माहिती आदीच्या ब्लॉग वर आहे,खाली लिंक दिलेली आहे कृपया लिंक ओपन करून पाहणे
Rayreshwar,nageshwar temple and hanging bridge
महाराजांचे गड किल्ले बघताना आपण त्या इतिहासात कधी हरवून जातो समजतच नाही,आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून एखाद दिवस असा इतिहासात हरवुन जायची मजाच काही और आहे.
या प्रकारे अजून एका सुखद ऐतिहासिक अनुभवाची भर आयुष्याच्या वहीत लिहली गेली.
आपण अमूल्य वेळ काढुन वाचल्या बद्दल धन्यवाद ...

Comments
Post a Comment